ऑनलाईन टीम/तरुण भारत
लखीमपूर हिंसाचारात आतापर्यंत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ शेतकऱ्यांचा (Farmer) समावेश आहे. तर, इतर ४ जण हे भाजपा कार्यकर्ते आहेत. याशिवाय एका स्थानिक पत्रकाराचा देखील या घटनेत मृत्यू झाला. लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात लखीमपूर हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून मिळालेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आशिष मिश्राचा जामीन रद्द करावा यासाठी एसआयटीने (SIT) योगी सरकारकडे दोनदा शिफारस केली आहे.
दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीनं (SIT) सर्वोच्च न्यायालयासमोर आपली भूमिका मांडलीय. एसआयटीनं सांगितलं की, आम्ही यूपी सरकारला दोनदा शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या आशिष मिश्राचा (Ashish Mishra) जामीन रद्द करण्याची मागणी केली. मात्र, आशिष मिश्राचा जामीन अद्याप रद्द झालेला नाही. त्यामुळे तपासासाठी त्याचा जमीन रद्द करावा अशी मागणी केली.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीनं आपल्या अहवालात म्हंटलंय, मुख्य आरोपी आशिष मिश्राला जामीन नामंजूर करण्यासाठी एसआयटीनं उत्तर प्रदेश सरकारला दोनदा शिफारस केली होती. मात्र, जामीन रद्द करण्याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही.