सिंगापूर
सिंगापूरमध्ये अँटी-व्हॅक्सिनेशल ग्रूपशी संबंधित 33 वर्षीय एका डॉक्टरने लोकांना कोरोनाच्या लसीऐवजी सलाइन सोल्युशनचे इंजेक्शन दिले आहे. याचबरोबर आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल व्हॅक्सिनेशन रजिस्ट्रीमध्ये चुकीचा डाटाही त्याने अपलोड केला होता. याप्रकरणी डॉ. जिप्सन क्वाह याला सिंगापूर मेडिकल कौन्सिलने 18 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. डॉ. क्वाह हा लसीकरणविरोधी गट ‘हीलिंग द डिव्हाइड’चा सदस्य आहे. डॉक्टरने कोरोना लसीच्या नावाखाली लोकांकडून मोठी रक्कमही वसूल केली होती.









