प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथील कर्नाटक राज्य लॉ युनिव्हर्सिटीमधून एलएलबी परीक्षा झाली होती. त्यामध्ये ऐश्वर्या पवार हिने युनिव्हर्सिटीत तिसरा क्रमांक मिळविला होता. तिला दि. 26 मार्च रोजी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ऐश्वर्या ही सध्या बेंगळूर येथे संशोधन विभागामध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
ऐश्वर्या हिने बीए पदवीनंतर हुबळी येथील युनिव्हर्सिटीमधून एलएलबीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. ऍड. बी. आर. पवार यांची ती कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.