राजापूर
राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे 28 ते 30 मार्च या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड दौऱयावर असून 29 रोजी ते रत्नागिरी दौऱयावर येणार आहे.
सिंधुदुर्गातून मंगळवारी सकाळी ते रत्नागिरी जिल्हय़ात प्रवेश करणार आहेत. राजापुरातील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांना धावती भेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर सकाळी 10.30 वा. साटवली रोड, लांजा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे उद्घाटन नामदार ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर 11 वा. लांजातील शिवपार्वती मंगल कार्यालय येथील मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. लांजातील कार्यक्रमानंतर दुपारी ठाकरे गणपतीपुळे येथे जाणार आहेत.
दुपारी गणपतीपुळे येथे श्रींचे दर्शन घेऊन 2.30 वा. गणपतीपुळे विकास आराखडा अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच टॉवर लाईटचे व सिंधुरत्न समृध्द योजनेचे लोकार्पण ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. 3.30वा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोट क्लबची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5.30वा. गुहागर येथील वेळणेश्वर येथे धूपप्रतिबंधक बंधारा भूमिपूजन व मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
30 मार्च रोजी सकाळी 9 वा. चिपळूण, सावर्डे येथील चित्रकला महाविद्यालय व स्व.निकम यांच्या समाधीस्थळाला भेट, 9.30वा. वशिष्ठी नदीतील गाळ उपशाची पाहणी, पोर्टेबल एलईडी लाईट सिस्टीम व रबर बोट लोकार्पण सोहळा, या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 11.30वा. दापोली केळस्कर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाचे अनावर ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते महाडकडे रवाना होणार आहेत.









