ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. उड्डाणापूर्वी स्पाईसजेटचे विमान मागे घेत असताना ते विजेच्या खांबाला धडकले. यात विमानाच्या पंखाचे आणि खांबाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत विमानातील कोणताही प्रवाशी जखमी झाला नाही.
आज सकाळी स्पाईसजेट कंपनीचे विमान जे दिल्लीहून जम्मूसाठी उड्डाण करणार होते. त्यासाठी विमान मागे घेत असतानाच ते विजेच्या एका खांबाला धडकले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, विमानाच्या पंख्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघाताची चौकशी सुरू असून, प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची सोय करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.