ऑनलाईन टीम / नगर :
अहमदनगरच्या श्रीरामपूर एमआयडीसीत एका केमिकल कंपनीला दुपारी 12 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. संपूर्ण कंपनीच आगीच्या भक्षस्थानी पडली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला आग लागली. क्षणार्धात आगीने रुद्र रुप केल्याने संपूर्ण कंपनीच आगीच्या भक्षस्थानी पडली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी श्रीरामपूर, लोणी आणि राहता येथील अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.