भाजीपाला आवकेत वाढ झाल्याने दरात घसरण
वार्ताहर /अगसगे
बेळगाव एपीएमसी बाजारात शनिवारी कांदा, बटाटय़ाचा भाव स्थिर राहिला आहे. भाजी मार्केटमध्ये हिरव्या मिरचीचे दर स्थिर असून इतर भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत.
भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी कमी आणि आवक जास्त झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.
बेळगाव एपीएमसी बाजारात इंदोर बटाटा कमी प्रमाणात येत आहे. सध्या तालुक्यातील जवारी बटाटा बाजारात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कांदाही येत आहे. यामुळे कांद्याचा भावदेखील स्थिर आहे.
शनिवारी बाजारात महाराष्ट्रातून 32 ट्रक कांदा, पांढरा कांदा एक ट्रक, इंदोर बटाटा पाच ट्रक, जवारी बटाटा सुमारे तीन हजार पिशव्या आवक झाल्याची माहिती अडत व्यापारी कल्लाप्पा गडकरी यांनी दिली.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी………….. 800 ते 1200 रु.
- शेपू……………. 500 ते 600 रु.
- पालक…………. 200 ते 300 रु.
- कांदापात………. 200 ते 300 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 900 ते 1000 रु.
- बेळगाव कोथिंबीर 300 ते 500 रु.
- लाल भाजी 400 ते 500 रु.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी………….. 300 ते 500 रु.
- मीडियम……… 800 ते 1200 रु.
- मोठवड…….. 1300 ते 1500 रु.
- गोळा………. 1500 ते 1700 रु.
इंदोर बटाटा… 1600 ते 2000 रु.
लाल कांदा प्रति क्विंटल
- गोळी………….. 500 ते 700 रु.
- मीडियम……. 1000 ते 1300 रु.
- मोठवड…….. 1300 ते 1400 रु.
- गोळा………. 1400 ते 1500 रु.
- पांढरा कांदा 700 ते 1200 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची…….. 300 ते 400 रु.
- इंदोर ढबू मिरची. 350 ते 450 रु.
- बिन्स………….. 300 ते 400 रु.
- कारली………… 250 ते 350 रु.
- वांगी………….. 200 ते 250 रु.
- मालिनी पांढरी काकडी 80 ते 150 रु.
- दोडकी…………. 180 ते 250 रु.
- कोबी……………… 20 ते 40 रु.
- इंग्लिश गाजर….. 220 ते 280 रु.
- भेंडी…………… 200 ते 250 रु.
- बिट………………. 50 ते 80 रु.
- जवारी काकडी…. 200 ते 250 रु.
- आले…………… 280 ते 300 रु.
- मटार………….. 550 ते 650 रु.
- हिरवी मिरची… 900 ते 1000 रु.
- जी फोर मिरची… 800 ते 900 रु.
- दुधी भोपळा डझन.. 80 ते 150 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे……. 80 ते 150 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विं.2000 ते 2500 रु.









