प्रतिनिधी / सातारा :
शहरातील करंजेतर्फे निसर्ग कॉलनीत राहत असलेल्या 15 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला कोंडवे गावच्या हद्दीत माळवाडी येथे नेऊन 6 जणांनी मारहाण केली. याप्रकरणी जमीर शेख(रा. निसर्ग कॉलनी, करंजे सातारा), अशपाक शेख यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे येथील निसर्ग कॉलनीत राहत असलेला इस्माईल हमीदुल्ला खान (वय 15) याला दि. 23 रोजी 8.45 वाजण्याच्या सुमारास जमीर शेख व आशपाक शेख यांच्यासह अनोळखी 6 जणांनी जबरदस्ती इनोव्हा कार (क्रं. एम.एच 14 ए.एम.6532) मध्ये बसवून कोंडवे येथील माळवाडी येथे नेले. तेथे लाकडी दांडक्याने, हाताने त्याला मारहाण केली. या प्रकरणी इस्माईल याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदेवे करत आहेत.









