जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल कुणालाच माहिती नाही. मोहनजोंदडो आणि हडप्पा ही ठिकाणे हजारो वर्षांपूर्वी शहरे आणि नगरांचे अस्तित्व होते याचा पुरावा देणारी आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासासोबत हरवून गेलेल्या ठिकाणांबद्दल माहिती मिळू लागली आहे. आता गूगल मॅपच्या मदतीने एका अशाच शहराचा शोध लागला आहे. हे शहर सुमारे 4 हजार वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे.

इराकमध्ये वाळूखाली दाबले गेलेले हे शहर शोधण्यात आले आहे. या शहराचा शोध लागल्याने अनेक रहस्यांची उकल करता येणार असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. पृथ्वीवर काही संस्कृती 5000 वर्षे जुन्या असल्याचे इतिहासकारांचे मानणे आहे. इराकमध्ये 4 हजार वर्षे जुने सापडलेले शहर निश्चितपणे कुठल्या तरी जुन्या संस्कृतीशी निगडित असेल.
4000 वर्षांपूर्वी या शहराला ‘उरू’ या नावाने ओळखले जात होते. त्या काळात या शहराची लोकसंख्या सुमारे 65 हजार इतकी होती. ज्या भागात हे शहर सापडले आहे, त्या काळात या भागाला दक्षिण मेसापोटामिया नाव होते. परंतु अता याला दक्षिण इराक म्हणून ओळखले जाते. तेथे युप्रेट्स नदी वाहायची, ज्याच्या काठावर हे शहर वसलेले होते. उरू शहराचा उल्लेख एका धर्मग्रंथात देखील आहे.









