फोंडा पालिका मुख्याधिकाऱयाचे मौनव्रत; एमई आक्रमक पोलीस स्थानकाजवळील खुली जागेचा उपयोग व्हावा
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पालीका क्षेत्राच्या सोपो कराची निविदा प्रक्रिया आचारसंहितेमुळे अडकल्याने सोपोसाठी नव्याने निविदा न काढता सद्या असलेल्या कंत्राटदारालाच सोपो आकारणीसाठी एक महिन्यासाठी मुदतवाढ, तसेच फेंडय़ातील पांढरा हत्ती बनण्याकडे वाटचाल करणारा बाजार प्रकल्पातही व्यापाऱयांना आकर्षित करण्यासाठी सुलभ योजना करून चालना देण्याचा महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती फोंडा पालीकेच्या नगराध्यक्ष गीताला तळावलीकर यांनी दिली.
काल मंगळवारी झालेल्या पालीका मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोपो कराच्या मागील थकबाकी व इतर सोपो करासंबंधी नियम सुटसुटीत करण्यासाठी महिन्यानंतर प्रक्रियाही करण्यात येणार आहे. यावेळी पालीकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी, उपनगराध्यक्ष जया सावंत उपस्थित होते. मागील दोन महिन्यापासून निवडणूक कामात मुख्याधिकारी व्यस्त असल्यामुळे पालीकेची कामे खोळंबलेली आहे त्यामुळे सर्व नगरसेवकासह, पालीकेचे अधिकारी एमई यांचाही रोष मुख्याधिकाऱयांना पत्कारावा लागला. विश्वनाथ दळवी, प्रदीप उर्फ झालू नाईक, शांताराम कोलवेकर, रितेश नाईक यांनी चर्चेत सहभाग घेतला.
वरचा बाजार प्रकल्प पुर्नजिवीत करण्यासाठी सुलभ योजना
नगरसेवक व्यंकटेश नाईक म्हणाले की शहराला लागून असलेल्या पंचायत क्षेत्रातही रस्त्यालगत बसणाऱया व्यापाऱयामुळे फोंडा पालीकेला सोपे करात घट झालेली आहे. आचारसंहितेमुळे रखडलेला सोपो निविदा प्रक्रिया पुर्ण करता न आल्यामुळे कंत्राटदाराला एक महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. वरचा बाजार फोंडा येथील बाजार प्रकल्पाच्या दुकानासाठी बोलीदार मिळत नसल्याने सद्यपरिस्थितीत हा प्रकल्प केवळ निम्यापेक्षा कमी क्षमतेत चालत आहे.
या प्रकल्पाचे काम अजूनही पुर्ण झालेले नसून वीजेची समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत अपयश आलेले आहे. वीज ट्रान्सफोर्मरची दुरूस्ती अजून पुर्ण झालेली नाही. लिफ्ट कार्यान्वि झालेली असली तरी स्वच्छतागृह व सोक पिटचे प्रश्न प्रलंबित आहेत. सदर प्रकल्पाला चालना देण्यासाठी वरचा मजल्यावरील भाडेदर रू. 2 हजार प्रति चौरस मिटर त्याच्याखालील मजल्यावर रू. 3 हजार प्रति चौरसर मिटर असा चढता क्रमात उपलब्ध करून सुलभ योजना आखण्यात आलेली आहे. दुकान भाडय़ात सवलत तसेच आगाऊ रक्कम म्हणून तीन महिन्यासाठी ठेवण्यात येत असलेली रू. 1 लाख रक्कम कमी करण्यात येणार आहे. एखादा मजला फेडरेशन किंवा इतर संस्थाना भाडेपट्टीवर दिल्यास पालीकेला महासूल प्राप्त होऊ शकतो अशी विचार मांडला. सदर प्रकल्पातून बऱयापैकी महसूल जमा करणे शक्य असून पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास 35 टक्के पालीका कर्मचाऱयाचा वेतन या प्रकल्पातून होईल असे मत व्यकंटेश नाइंक यांनी मांडले. याप्रकरणी पालीकेचे मुख्याधिकाऱयांनी मात्र बैठकीत मौनव्रत धारण केला होता. त्याऐवजी पालीकेत एमई म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱयाचा मात्र पारा चढलेला होता. हातवारे इशारे करीत तो पालीका बैठकीत तावातावाने उत्तरे देत सर्वाची करमणूक करीत होता. मुख्याधिकाऱयानी एमई विरोधात कारवाईचे संकेत दिल होता अशी माहिती नगराध्यक्ष गीताली तळावलीकर यांनी दिल्य़ानंतर सर्व चित्र स्पष्ठ झाले.
फेंडा पोलीस स्थानक जवळील जागेचा उपयोग पार्किगसाठी
फोंडा पोलीस स्थानकाला लागून असलेली मोकळय़ा जागेत पोलीस स्थानकांची वाहने, तसेच विविध नुन्ह्यात अडलेलील वाहनांनी व्यापून टाकलेली आहे. पोलीस स्थनकाने ती त्वरीत हटवावे असा आदेश बैठकीत घेण्यात आला. त्या जागेचा सदुपयोग करीत शहरातील पार्किंगसाठी करण्यात यावा अशी सुचना काही नगरसेवकांनी सुचविली.









