महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून निकाल जाहीर
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या 60 व्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर कोल्हापुरातील मेरीड इंडिया या संस्थेच्या ‘नेटवर्क 24/7′ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर शिवाजी विद्यापीठ संगीत व नाटय़शास्त्र विभागाच्या ‘अंधायुग’ या नाटकाने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. या दोन्ही नाटकातील कलाकारांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कोल्हापूर केंद्रावर 23 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत राज्य हौशी नाटय़स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 22 संस्थांनी आपले नाटय़प्रयोग सादर केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री आमोणकर, राजेंद्र पाटणकर, सुहास खंडारे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले. कोल्हापूर केंद्रावर झालेल्या प्रथम फेरीत कोल्हापुरातील युवक मित्र मंडळ संस्थेच्या ‘गगन दमामा बाज्यो’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक विद्यासागर अध्यापक (नाटक-नेटवर्क 24/7), व्दितीय पारितोषिक ज्ञानेश मुळे (नाटक-अंधायुग), प्रकाश योजना ः प्रथम पारितोषिक आशिष भागवत (नाटक- नेटर्क 24/7), व्दितीय पारितोषिक संजय तोडकर (नाटक-अंधायुग), नेपथ्य ः प्रथम पारितोषिक प्रकाश पाटील (नाटक-नेटवर्क 24/7), व्दितीय पारितोषिक ओंकार पाटील (नाटक-अंधायुग), रंगभूषा ः प्रथम पारितोषिक ओंकार फाटील (नाटक- अंधायुग), व्दितीय पारितोषिक विजयालक्ष्मी कुंभार (नाटक- गगन दमामा बाज्यो), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ः अजय इंगवले (नाटक-अंधायुग) व आदिती देशपांडे (नाटक-कातळडोह), अभिनयसाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ः प्रवीण पाटील (नाटक-चांगुलपणा), मीना पोतदार ताशिलदार (नाटक-नॉर्थ पोल साऊथ पोल), उज्वल्ला खांडेकर (नाटक-नेटवर्क 24/7), आसावरी निगवेकर (नाटक-उत्तरामचरित), रितीक राजे (नाटक-सुलतान रजिया), सुबोध गद्रे (नाटक-स. न. वि. वि.), सतीश तांदळे (नाटक-गगन दमामा बाज्यो), राजन जोशी (नाटक-नेटवर्क 24/7), प्रसाद जमदग्नी (नाटक-नॉर्थ फोल साऊथ पोल), आदित्य कुंभार (नाटक-कातळडोह).