नवी दिल्ली
डोडला डेअरी लिमिटेडच्या समभागाच्या भावाने सोमवारी शेअरबाजारात 20 टक्के इतकी उसळी घेतली होती. याआधी कंपनीने कृष्णा मिल्कचे अधिग्रहण केले होते. त्यामुळे डोडलाचा समभाग चमकल्याचे सांगण्यात येते.
डोडलाने आपल्या व्यवसाय विस्ताराच्या कार्यक्रमांतर्गत अलीकडेच कर्नाटकातील कृष्णा मिल्क प्रायव्हेट लिमिटेडचे 50 कोटी रुपयांच्या माध्यमातून अधिग्रहण केले आहे. बीएसईवर डोडला डेअरीचा समभाग 19.23 टक्के वाढीसह 548 रुपयांवर व्यवहार करत होता. एनएसईवरही कंपनीचा भाव 19.99 टक्के वाढीसह 548.45 रुपयांवर व्यवहार करत होता. दरम्यान उभयतातील अधिग्रहणाची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
1989 पासून दुग्ध व्यवसायात
दरम्यान, कर्नाटकात कृष्ण मिल्क प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 1989 पासून कार्यरत आहे. कर्नाटकातील दूध क्षेत्रातील ही पहिली खासगी कंपनी आहे.









