नवी दिल्ली
ओप्पो कंपनी आपला नवा के 10 हा स्मार्टफोन येत्या 23 मार्चला लाँच करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने नुकतेच एक टीझर प्रदर्शित केलंय. त्यात या नव्या स्मार्टफोनची माहिती पुढे आलीय.
स्नॅपड्रगन 680 प्रोसेसरसह पंच होल डिस्प्लेसह ट्रिपल कॅमेरा या फोनमध्ये असेल. भारतात या फोनची किंमत 20 हजार रुपयेपर्यंत असेल, असेही सांगितले जात आहे. फुल एचडी डिस्प्लेसह 50 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा याला असेल. यासोबत 5000 एमएएच क्षमतेची मजबूत बॅटरी असणार आहे. येत्या 23 मार्च रोजी सदरचा स्मार्टफोन प्रत्यक्षात लाँच होईल, असे सांगितले जात आहे.
फोनची वैशिष्टय़े
w अँड्रॉईड 11 सह कलर ओएस 11.1 वर चालेल
w 6.5 इंचाचा फुल एचडी/एलसीडी डिस्प्ले मिळेल
w 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची व्यवस्था
w मायक्रो एसडी कार्ड (स्टोरेज वाढविण्यासाठी)
@50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा एआय सेल्फी कॅमेरा
@5000 एमएएचची बॅटरी- 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सुविधा









