शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील माती उत्खननास जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर परवानगी द्यावी. महसूल , भरूनही शिरोळ तालुक्यात माती उत्खननास बंदी घालण्यात आली आहे. ती त्वरित बंदी उठवावी अशी मागणी शिरोळ तालुका वीटभट्टी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दादासो कुपाडे, उपाध्यक्ष शिवाजी म्हैशाळे यांनी एका निवेदनाद्वारे दिली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिरोळ तालुक्यामध्ये 91 जणांचे छोटे-मोठे वीट व्यवसाय आहेत. त्यापैकी तीस जण कुंभार समाजाचे असून, 61 जण अन्य इतर समाजाचे आहेत.
शिरोळ तालुक्यामध्ये चालू वर्षी, माती उत्खनन पोटी , शासनाला 1 एक कोटी वीस लाख महसूल, जमा झाला आहे. अजून काही महसूल पोटी शासनाला रक्कम मिळणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका, वगळता सर्वत्र कायदेशीर माती उत्खनन सुरू आहे. तालुक्यातील आठ जणांनी, माती उत्खनन व वाहतूक इ चलन भरलेले असूनही, 1 ब्रास देखील माती उत्खनन करण्यात आलेला नाही. या वीट भट्टी व्यवसायावर शिरोळ तालुक्यामध्ये दहा हजार 1 मजूर अवलंबून आहेत.
शिरोळ तालुका हा सर्वात जास्त, माती उत्खननातून महसूल देणारा तालुका आहे. मजुरांना मोठ्या प्रमाणात। एडवांस द्यावे लागते. हा उद्योग, हंगामी असून गेले वीस दिवस झाले माती उत्खनन बंद असल्यामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे . या व्यवसायासाठी काढण्यात आलेले , कर्जही फुटलेले नाही. अन्न वस्त्र निवारा यापैकी, निवारा हा वीट भट्टी व्यवसायावर अवलंबून आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामी जातीने लक्ष घालून, माती उत्खननास कायदेशीर परवानगी द्यावी. अन्यथा सदनशील मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वीट भट्टी व्यवसायिकांनी दिला आहे. यावेळी माजी सरपंच गजानन संकपाळ, सुनील कुंभार, चंद्रकांत गुणवान, राकेश जगदाळे, युवराज बोंद्रे, अशोक पाटील, नेमिनाथ जगावे. यांच्यासह वीटभट्टी व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.