यशवंत सिन्हा यांचे वादग्रस्त ट्विट
ऑनलाईन टीम/तरुण भारत
द काश्मिर फाईल्स या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट देशातील अनेक राज्यांनी चित्रपट टॅक्स फ्री म्हणून घोषित केला आहे. एकीकडे चित्रपटातून काश्मिरी पंडितांचे सत्य जगासमोर मांडल्याने चित्रपटाचे कौतुक होतय तर दुसरीकडे चित्रपटावर सडकून टीका केली जातेय. तर पंतप्रधान मोधींनी ही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तर तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी चित्रपटावरुन एक वादग्रस्त ट्विट करत सत्ताधारी भाजपला टोला लगावला आहे.
यशवंत सिन्हा यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलेय, “द काश्मिर फाईल्स चित्रपट संपूर्ण भारतात टॅक्स फ्री करणे पुरेसे नाही. तर हा चित्रपट सर्व भारतीय लोकांना पाहणे सक्तीचे व्हावे यासाठी संसदेने एक कायदा करावा. तसेच जो चित्रपट पाहणार नाही त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केली पाहिजे. त्याचप्रमाणे जे चित्रपटावर टीका करतील त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा करायला हवी”, असे उपरोधिक ट्विट करत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.