वृत्तसंस्था / श्रीनगर
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ातील अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलांनी एका चकमकीत एका दहशतवाद्याला यमसदनी पाठविले आहे. संबंधित भागात मंगळवारी संध्याकाळपर्यंत चकमक सुरूच होती. पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफच्या जवानांनी चरोसा भागाला पूर्णपणे घेरले आहे. परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2-3 असू शकते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.मंगळवारी पहाटे चरोसा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. सुरक्षा दल तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले असून यात एक दहशतवादी मारला गेला आहे.