युक्रेनच दावा
सीरियात भाडोत्री सैनिकांसाठी भरती केंद्रे सुरू करण्यात आली असून तेथे अलिकडच्या दिवसांमध्ये एक हजाराहून अधिक जणांची भरती करण्यात आली आहे. यातील सुमारे 400 जण रशियात पोहोचले आहेत असे युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफकडून सांगण्यात आले. रशियाच्या रोस्तोव्ह आणि गोमेल क्षेत्रांमध्ये युक्रेनच्या सीमेनजीक या भाडोत्री सैनिकांच्या वास्तव्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी शिबिरांची स्थापना करण्यात आली आहे.
रशियाचे सैनिक युक्रेनविरोधातील युद्धामध्ये स्वतःची शस्त्रs खाली ठेवत आहेत. यामुळे रशियाकडून सीरियातील भाडोत्री सैनिकांच्या तुकडीची निर्मिती करण्यात येत आहे. हे भाडोत्री सैनिक पैशांसाठी रशियन कमांडर्सच्या गुन्हेगारी आदेशांचे पालन करणार असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे.









