पुतीन यांच्यासमोर नवे संकट
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने रशियाकडे आता केवळ 10-14 दिवस पुरू शकेल इतकाच दारूगोळा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. एकीकडे दारूगोळा संपत चालला आहे, तर दुसरीकडे युद्धभूमीत आघाडी घेणे रशियाला अवघड ठरू लागले आहे. याचबरोबर ज्या भागांवर रशियाने कब्जा केला आहे, तेथेही नियंत्रण कायम राखणे त्याच्यासाठी अडचणीचे ठरत चालले असल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. रशियाने काही दिवसांपूर्वी चीनकडून सैन्य मदतीच्या स्वरुपात शस्त्रास्त्रs ड्रोन्स मागितले आहेत.
कीव्ह समवेत युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये रशियाच्या बॉम्बवर्षावानंतरही रशियाच्या सैन्याला आघाडी घेणे अशक्य ठरू लागले आहे. पुतीन यांच्या सहकाऱयांनीही ही बाब मान्य केली आहे. रशियाचा जमिनीवरील हल्ला जवळपास थांबला असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱयांनी केला आहे. युक्रेन युद्धात रशियाची शस्त्रास्त्रs संपत चालली आहेत. त्याचे सैनिक कमी पडू लागले असून ऊर्जा देखील संपतेय. रशियाकडे आता केवळ 14 दिवसांचा वेळ राहिल्याचे ब्रिटनच्या एका अधिकाऱयाने म्हटले आहे.
रशियाला मोठे नुकसान
युक्रेनमध्ये प्रतिकार असलेल्या सैन्याने रशियाच्या हल्लेखोर सैन्यापेक्षा अधिक शक्तिशाली होण्याची हीच वेळ असल्याचे ब्रिटनच्या अधिकाऱयाने म्हटले आहे. युक्रेनचे रक्षण करणारे साहसी सैनिक रशियाच्या सैन्याला प्रचंड नुकसान पोहोचवत आहेत. लवकरच पाडविण्यात आलेल्या रशियन हेलिकॉप्टर्सची संख्या शेकडांमध्ये पोहोचणार आहे. रशियाने पूर्वीच 80 लढाऊ विमाने गमाविली आहेत. रशियाच्या सैन्याचे शेकडो रणगाडे आणि हजारोंच्या संख्येत अन्य उपकरणे नष्ट झाली आहेत. 19 दिवसांच्या युद्धात रशियाला चेचेन्यामध्ये अनेक वर्षांपर्यंत चाललेल्या युद्धापेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागले असल्याचे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांनी काढले आहेत.
याचदरम्यान युक्रेनमध्ये आमची सैन्य कारवाई योजनेनुसार सुरू असल्याचा दावा रशियाच्या सैन्याने केला आहे. युक्रेन युद्धात आमच्या विचारानुसार गोष्टी वेगाने घडत नसल्या तरीही आम्ही विजय प्राप्त करू. युक्रेनच्या मोठय़ा शहरांवर स्वतःचा कब्जा कायम ठेवू शकतो असे रशियाच्या नॅशनल गार्डचे प्रमुख व्हिक्टोर जोलोतोव्ह यांनी म्हटले आहे.