प्रतिनिधी/बेळगाव
बेळगाव शहराच्या भवानीनगर परिसरात रियल इस्टेट एजंटचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी पहाटे फिरायला जाताना डोळय़ात तिखट फेकून भोकसून त्याचा खून करण्यात आला. राजू मल्लाप्पा दोड्डबोम्मण्णावर (वय 45) असे त्या रियल इस्टेट एजंटचे नाव आहे.बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिस तपास सुरू आहे.









