राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथील बसवनगुडी स्विमिंग ऍकॅडमी व दिव्यांग संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. प्रज्ज्वल नारळीकरने तीन प्रकारात प्रथम स्थान मिळवत सुवर्णपदक पटकावले. पृथ्वी नारळीकरने द्वितीय स्थान पटकावत रौप्यपदक पटकाविले. या दोघांचीही उदयपूर (राजस्थान) येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी, कार्याध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी कौतुक केले आहे. केएलई स्विमिंग क्लबचे प्रशिक्षक उमेश कलघटगी व नितेश यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. शाळेतील 20 विद्यार्थ्यांना दररोज पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.









