प्रतिनिधी /वास्को
अन्याय निवारण सेवा समिती व गोरक्षा फाऊंडेशनतर्फे समाजातील 31 समाजसेवकांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये समाजसेवक व वेर्णा येथील इंडोको रेमिडीज कंपनीचे अधिकारी अरविंद प्रभू यांचाही समावेश होता. हा सन्मान समारोह राजभवन मुंबई येथे पार पडला.
सदर सन्मान समितीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेठ, राष्ट्रीय सचिव कृष्णा कवठणकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रमोद पांडेय, महाराष्ट्राच्या अध्यक्ष विशाताई पराडकर, मुख्य अतिथी मुंबईचे सीमाशुल्क मुख्य आयुक्त प्रमोद कुमार अग्रवाल, मध्यरेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.









