नवी दिल्ली
महानंदी कोलफिल्डस लिमिटेड ही 2021-22 आर्थिक वर्षातील सर्वाधिक कोळसा उत्पादन घेणारी आघाडीवरची कंपनी ठरली आहे. सदरच्या कंपनीने सदरच्या आर्थिक वर्षात 157 दशलक्ष टन इतके कोळशाचे उत्पादन घेतले आहे. 16 टक्के वाढीच्या अनुषंगाने कंपनीने आर्थिक वर्षात 157.7 दशलक्ष टन कोळसा उत्पादीत केला आहे. चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक ओ पी सिंग यांनी याप्रसंगी आपल्या सर्व स्टाफ, अधिकारी आणि समभागधारकांचे योगदानाबद्दल आभार मानले आहेत. कोळसा उत्पादनात कंपनीने केलेली कामगिरी स्पृहणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









