प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतात. राजकीय पक्षांच्यादेखील. आजचा रंक उद्याचा राव असतो. रावाचा कधी रंक होतो ते कळत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधी
उत्तर प्रदेशसह 4 राज्यामंध्ये विजय मिळाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘अब असली लढाई मुंबई मै होगी’ असे म्हणताना मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले त्यातच भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी.रवी यांनी भाजपने हिंदुत्व सोडले आता भगवाही विसरतील अशी टिपणी करत मुंबई महापालिका स्वबळावर जिंकण्याचा मनोदय जरी व्यक्त केला असला तरी मुंबई म्हणजे गोवा नाही, त्यामुळे जे भाजपला इतर राज्यात जमले ते मुंबईत जमेल ? आणि भाजपच्या या रणनितीला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह महाविकास आघाडी कसे उत्तर देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय लढाई सुरू झाली असून भाजपने उत्तर प्रदेशसह 4 राज्यात विराट विजय मिळवल्यानंतर भाजपने फ्रंट फुटवर येत जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली असून, गोव्यातील विजयानंतर मुंबईत आलेल्या फडणवीस यांचे जोरदार स्वागत करताना भाजपने शक्तीप्रदर्शन केले. विजयाच्या आधी आणि विजयानंतर कसा इव्हेंट करायचा हे भाजपाइतके कोणालाच जमत नाही. नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात मोर्चा काढून भाजपने मुंबईत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार वातावरण निर्माण केले. अधिवेशनाच्या दोन आठवडे मलिकांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनाच्या पर्यायांवर आंदोलन घोषणा देणारी भाजपकडून तिसऱया आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी हा मुद्दा सोडला की काय असे चित्र दिसत होते. एकीकडे भाजप मलिकांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असताना दुसरीकडे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी मलिकांच्या पाठीशी ठाम असल्याचे वारंवार सांगण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी टि.सी.राव यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन टिका केली आहे, भाजपने हिंदुत्व सोडले असून लवकरच भगवाही विसरतील अशी टिका राव यांनी केली आहे. नवाब मलिक आणि दाऊदच्या विरोधात रान पेटवताना भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरुन लोकांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप अद्यापही हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेला खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही आणि भाजप मात्र त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत असल्याचेच दिसत आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थ संकल्पात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांर्तगत राज्यातील महापुरूषांशी संबंधित गावांतील 10 शाळांची निवड करण्यात आली. त्यात महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महर्षी कर्वे, साने गुरूजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, क्रांतीसिंह नाना पाटील या महापुरूषांच्या गावांतील शाळांची निवड करण्यात आली. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव या यादीत नसल्याबाबत भाजपकडून खेद व्यक्त करण्यात आला तसेच औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी 11 मार्च रोजी संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बोलताना औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय काढला की, मंत्री अनिल परब पेंद्राकडे जाण्याची भाषा करतात. या विषयावर तुम्हाला जर पेंद्राची मदत लागत असेल, तर मी स्वतः तेथे मुक्काम करेल आणि पेंद्राने अनुमती दिली नाही, तर राजीनामा देईन आणि आयुष्यात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा थेट विधानसभेतच केली. त्यामुळे हिंदुत्वापासून शिवसेना दूर जात असल्याचे दाखवण्यासाठी भाजप एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपने निवडणूक लढविताना हिंदु मतांचे धुवीकरण झाल्यानेच विजय मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने निवडणूक लढताना 80/20 असा फॉर्म्युला ठेवला होता जर 80 हिंदु तर 20 मुस्लिम जर भाजप मुंबई महापालिका निवडणूक हिंदुत्वाच्या आणि महापालिकेवर सत्ताधारी शिवसेनेने केलेला भ्रष्टाचार या मुद्यावरुन लढणार असल्याचे सुतोवाच केलेले असले तरी मुंबईतील संमिश्र मतदार बघता भाजपला त्यात मुंबईतील मराठी माणसाची भूमिका ही नेहमीच शिवसेनेला अनुकुल राहीली आहे. त्यामुळे अधिवेशन झाल्यानंतर एप्रिल महिन्यात खऱया अर्थाने मुंबई महापालिका निवडणुकीची रंगत वाढणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आता आजारपणातून बरे होऊन सक्रिय होऊ लागल्याने ते भाजपची हवा काढण्यात आगामी काळात कोणतीही कसूर ठेवणार नाहीत हे नक्की. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून भाजपने शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेने भाजपच्या कुठल्याही आरोपाला किंवा आवाहनाला भिक घातली नाही, भाजपला जर राज्यात सत्तेवर यायचं असेल तर शिवसेनेच्या टेकूशिवाय सध्या तरी पर्याय नाही, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे एकदाच विरोधकांनी केलेल्या आरोपाचा चांगलाच समाचार घेताना ते थेट आम्ही भाजपला सोडले हिंदुत्व सोडलेले नाही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असे वक्तव्य करताना भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्याची हवाच काढुन टाकतात, हिंदुत्वाची पहिली प्रयोगशाळा गुजरात नसून विलेपार्ले असल्याचं अनेक जण सांगतात. एप्रिल 1989 मध्ये विलेपार्ले पोट निवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाला पेंद्रस्थानी ठेऊन प्रचार करताना रमेश प्रभु हे विजयी झाले. शिवसेनेच्या विजयानंतर मात्र हिंदुत्वाची राजकीय व्याप्ती आणि त्याआधारे शक्य असलेलं जनमत परिवर्तनाबद्दलची खात्री नंतरच्या काळात भाजपला झाली. भाजपलाही ठोस भूमिका घेण्यासाठी वाजवी मुद्याची गरज होती. ती गरज राममंदिराचा मुद्दा हातात घेतल्यानंतर पूर्ण झाली. यानंतर 92 ला बाबरी मश्जिद पडली आणि मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट यानंतर शिवसेना-भाजप 1995ला सत्तेत आली. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा तापू लागल्याने जे इतर राज्यात भाजपला जसे यश मिळाले तसे यश मुंबईत मिळणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.








