ऑनलाईन टीम / तरुण भारत
जनावरांकडून देखील असे कृत्य होणार नाही असे कृत्य मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात घडल्याचा लाजिरवाणा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण भर रस्यात एका मुलीचा विनयभंग करत असल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच भगोरिया महोत्सवामधील असल्याची माहिती समोर आली आहे. आदिवासीबहुल अलीराजपूरच्या बालपूर गावात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका मुलीवर काही मुलांनी धावून जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं ही स्पष्ट झालं आहे.
व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होते आहे कि, एक मुलगी तिथे उभ्या असलेल्या कारच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तिथून जात असलेल्या टोळक्यातील तरुण धावत येतो आणि तिला अश्लीलपणे स्पर्श करू लागतो. यानंतर काही वेळातच आणखी एका तरुण तीला अश्लिलरित्या स्पर्श करतो आहे. व तो तरुण तीला ओढत त्या टोळक्यात ओढत घेऊन जातो. आणि ग्रुपमधील सर्व सदस्य मुलीचा विनयभंग करु लागतात. असे संपुर्ण व्यवस्था आणि माणुस म्हणुन जगत असलेल्या प्रत्येकासाची मान शर्मेने खाली जाईल असाच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओत दिसणारी तरुणी आणि तरुण शेजारच्या धार जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
याबद्दल अलीराजपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज सिंह यांनी याबद्दल सांगितले कि, पोलिसांनी दखल घेतली आणि गुन्हा दाखल केला आहे आणि ते म्हणाले की, आम्ही काही तरुणांची ओळख पटवली आहे. त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.