प्रतिनिधी / शिरोडा
शिरोडा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार व माजी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी तब्बल 2174 मतांची मोठी आघाडी मिळवित विजय संपादन केला आहे. त्यांना 8307 मते, तर दुसऱया क्रमांकावर आलेले त्यांचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे महादेव नाईक यांना 6133 मते मिळाली. तिसऱया स्थानी आलेले रिव्होल्युशनरी गोवन्सचे शैलेश नाईक यांना 5063 तर मगो पक्षाचे संकेत नाईक मुळे यांना 2397 मते मिळाल्याने ते चौथ्या क्रमांकावर राहिले.
शिरोडा मतदारसंघातून एकूण 8 उमेदवार रिंगणात होते व 25034 मतदान झाले होते. पाचव्या क्रमांकावर आलेल्या काँग्रेसच्या तुकाराम बोरकर यांना 1953, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुभाष फळदेसाई 576, अपक्ष स्नेलो ग्रासीएस 186 तर संभाजी ब्रिगेडचे मुकेश नाईक यांना 184 मते मिळाली. 235 मतदारांनी नोटाचा वापर केला.
2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सुभाष शिरोडकरांनी 4870 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला व सन् 2019 मध्ये शिरोडा मतदारसंघात झालेल्या पोट निवडणुकीत भाजपविरुद्ध मगो अशा थेट लढतीमध्ये शिरोडकर यांनी अवघ्या 70 मतांनी बाजी मारली होती. त्यानंतर भाजपामधील अँटी इन्कंबसीचा धोका व अन्य कारणांमुळे सुभाष शिरोडकर यांना ही निवडणूक जड जाईल, असे वाटत होते. मात्र त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंडय़ा चित करीत तब्बल 2174 मतांची आघाडी मिळवित दणदणीत विजय मिळविला आहे.









