राज्यातील चार कार्यकारी अधिकाऱयांचा होणार सन्मान : उत्तम कामगिरी केल्याने घेतली दखल
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयात दक्ष अधिकारी म्हणून काम केलेल्या मल्लिकार्जुन कलादगी यांना राज्यातील बेस्ट कार्यकारी अधिकारी म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यांनी केलेले काम लक्षात घेऊन त्यांचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील एकूण चार कार्यकारी अधिकाऱयांची यासाठी निवड झाली आहे.
2021-22 सालच्या महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेचे राज्य प्रमाणपत्र पुरस्कार दि. 14 रोजी 3.30 वाजता बँक्वेट हॉटेल, विधानसौध, बेंगळूर येथे होणार आहे. राज्य पातळीवरील उद्योग खात्री तसेच इतर योजनांतर्गत काम करणाऱया ग्राम पंचायत तसेच तालुका पंचायतच्या अधिकाऱयांचा गौरव करण्यात येणार आहे. मल्लिकार्जुन कलादगी यांनी बेळगाव तालुका पंचायतमध्ये दोन वर्षे सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. सध्या ते बदामी येथे रुजू झाले आहेत.
मल्लिकार्जुन कलादगी यांच्याबरोबरच पुष्पा कम्मार (ता. सागर, जि. शिवमोग्गा), नयन एस. (ता. नरसिंहराजपूर, जि. चिक्कमंगळूर), सोमशेखर बिरादार (ता. कुकनूर, जि. कोप्पळ) यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. कलादगी यांच्या कार्याची दखल राज्य सरकारने घेतल्याने बेळगाव तालुक्मयातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चिकोडी तालुक्मयातील साहाय्यक सचिव शिवानंद शिरगावी यांनाही उत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्मयातील सर्वच अधिकारी, पीडीओ व ग्राम पंचायत कर्मचाऱयांना आळस झटकून कामाला लागा, असे आवाहन करत विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. उद्योग खात्री योजनेतून त्यांनी बरीच कामे केली आहेत. विशेषकरून तलाव, छोटेखानी बंधारे बांधून पाणी साठविण्यासाठी प्रयत्न केले होते. राजकारणाला वैतागून त्यांनी स्वतःच आपली बदली करून घेतली होती.









