ऑनलाईन टीम/ तरुण भारत
पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारलेली पहायला मिळत आहे. तर काँग्रेसची पीछेहाट झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी उद्या राजीनामा देणार
मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक
उद्या सकाळी 11 वाजता होणार बैठक
चन्नी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उद्या राजीनामा देणार
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत
पतियाळा मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत
पंजाबमध्ये दिगज्जांना धक्का चन्नी, सिद्धू पिछाडीवर
पंजाबमध्ये दिगज्जांना धक्का बसला असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चन्नी हे दोनही जागेवरून पिछाडीवर आहेत. तर नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसहमधून पिछाडीवर आहेत.
पंजाबमध्ये आप ला मोठं यश
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मोठं यश मिळत असल्याचं दिसत आहे. ८९ आप आघाडीवर असून काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल ९ जागांवर पुढे आहे. भाजप ५ जागांवर पुढे आहे.
पंजाबमध्ये आप कार्यकर्त्यांचा जल्लोष
पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा पार केल्यामुळे आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांच्या संगरूर येथील निवासस्थानी कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.