आगीत रू. 1 लाखाच्या मालमत्तेची हानी, सुदैवाने जीवीतहानी टळली
प्रतिनिधी /फोंडा
कासवाडा तळावली येथील पंचायत कार्यालयाजवळील एका घराला आग लागून लाखो रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली. सदर घटना काल सोमवारी दुपारी 10 वा. सुमारास उघडकीस घडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फोंडा अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार कासवाडा येथील पांडु गोविंद नाईक यांच्या नावावर घर नोंदणीकृत आहे. सदर घरात तीन कुठूंबिय राहत आहे. आगीची सर्वाधिक झळ दामू नाईक यांच्या घराला बसली आहे. कौलारू घराचे माडाचे वासे जळून खाक झालेले आहे. सुमारे रू 1 लाखाची नुकसानी झाल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी दिली. फोंडा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात यश मिळवले. यावेळी दोन बंब वापरण्यात आले. फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास बायेकर, विजेंद शेटकर, योगेश वेलिंगकर, वामन गावडे, नरेश गावडे, स्वप्निल सावंत, जितेंद्र भांडारी, बिबत्सू सतरकर, अब्दूल नडाफ यांनी महत्वाचे मदतकार्य करून आग आटोक्यात आणली.









