अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 7 मार्च 2022 सकाळी 11.00
● तीन तालुक्यात नव्याने 5 जण बाधित
● 8 तालुक्यात बाधितवाढ शून्य
● सक्रिय रुग्ण संख्या मोजकीच
● हॉस्पिटलायझेशन मोजक्याच रुग्णांचे
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा तब्बल दोन वर्षानंतर कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहे. नव्याने बाधित आढळून येणारे रुग्ण हे 5 च्या खाली आले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बाधितांचा आकडा शून्य कसा होईल, यासाठी आरोग्य यंत्रणेचा प्रयत्न सुरू आहे. नव्याने बाधित आढळून येणाऱ्यामध्ये केवळ तीन तालुक्यात पाच जण बाधित आढळून आले आहेत. इतर 8 तालुक्यात एक ही बाधित आढळला नसून, रविवारी 477 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले होते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.05 वर आलेला आहे.
जिल्हा लकवरच कोरोनामुक्त
कोरोना जसा जिल्ह्यात आला तसा त्याने अनेक आकडे रेकॉर्ड केले. याच कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासन जीव तोड मेहनत घेत होते. आरोग्य यंत्रणा राबत होती. अजून ही राबत आहे. लसीकरण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. गावोगावी, शहरात लसीकरण मोहिम यशस्वीपणे सुरू करण्यात आली. त्यामुळे निश्चित आता जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या काही दिवसात जिल्हा हा कोरोना मुक्त होईल अशी आशा आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यातील 477 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ 5 जण बाधित आढळून आले. 1.05 पॉझिटिव्हीटी रेट आहे.
तीन तालुक्यात केवळ 5 बाधित
जिल्ह्यातील नव्याने बाधित आढळून येणाऱ्यामध्ये आता चांगली घट होत आहे. पाटण 1, सातारा 2 आणि वाई 2 असे तीन तालुक्यात 5 जण बाधित आढळून आहेत. इतर फलटण, कराड, जावली, खंडाळा, कोरेगाव, खटाव, माण आणि महाबळेश्वर या तालुक्यात नव्याने एकही बाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
सक्रिय रुग्ण संख्या अल्प
जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना हद्दपार करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. आता प्रत्येक तालुक्यातील बाधित येणाऱ्यांची संख्या घटती असून, सक्रिय रुग्ण संख्या अल्प प्रमाणात आहे. त्यातील सर्वच जण बरे होत आहेत. ही जिल्ह्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे.
सोमवारी
नमुने-477
बाधित-5
सोमवारपर्यंत
नमुने-25,58,375
बाधित-2,79,108
मृत्यू-6,689
मुक्त-2,71,638