सध्या जगभरात रशिया आणि युपेनचे युद्ध हाच एक चर्चेचा विषय आहे. भारत सुद्धा या चर्चेपासून दूर नाही. भारतातील जवळपास दहा हजारहून अधिक मुले उच्च शिक्षणासाठी युपेनमध्ये गेलेली असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष तिथल्या घडामोडींवर लागून राहिलेले आहे. त्यामुळेच ही मुले आणि युपेनमध्ये अडकून पडलेले भारतीय नागरिक मायदेशात कधी परततात याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. कर्नाटकातील एका विद्यार्थ्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्युनंतर संपूर्ण देश हळहळला आणि आपल्या परिसरातील जी मुले परत आली त्यांच्या बाबतीत लोकांनी आनंद व्यक्त केला. काहीनी तर सुटकेसाठी गेलेल्या चमूमधील अधिकारी, वैमानिक आपल्या शेजारी राहतात आणि आपल्याला त्यांचा अभिमान आहे अशा पद्धतीच्या पोस्ट ही समाज माध्यमांवर पसरवून त्यांच्याप्रती लोकांमध्ये आत्मीयता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यम किंवा वृद्धत्वाकडे झुकलेल्या वयातील पिढी अशा पद्धतीचे मजकूर पसरवताना दिसते आहे. मात्र त्याचवेळी युवापिढी अशा भावनिक पोस्ट पेक्षा वास्तवाचा विचार करताना अधिक दिसते आहे. ते हा प्रश्न जाणून घेत आहेत. त्यामागील प्रत्येक देशाची भूमिका समजून घेत आहेत. आपल्या परीने त्या विषयावर व्यक्त होत आहेत. देश आणि त्या देशांचे गट, त्यांची पूर्वीची भूमिका हे सुद्धा ते जेव्हा जाणून घेतात त्याच वेळी कोणताही एक विशिष्ट बाजूचा विचार मात्र या पिढीच्या मनात नसतो. अत्यंत तटस्थपणे या घटनेकडे पाहणारी ही पिढी व्यक्त होताना ही तितक्मयाच तटस्थपणे वागताना दिसत आहे. खुद्द युद्धभूमीवरून परतणारी युवापिढी सुद्धा तितक्मयाच तटस्थपणे या सर्व परिस्थितीकडे पाहत आहे, हेच जाणवणारी एक घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर वेगाने पसरतो आहे. युपेनहुन परतणाऱया विद्यार्थ्यांच्या विमानात एक मंत्री महोदय घोषणा देतानाचा हा व्हिडिओ आहे. या विद्यार्थ्यांमध्ये जोश निर्माण करताना भारत मातेच्या जयजयकाराचा घोष करतात तेव्हा वैद्यकीय आणि इतर उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले हे विद्यार्थी त्यांच्या घोषणेला जोरदार प्रतिसाद देतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयजयकाराच्या घोषणा जेव्हा ते मंत्री करतात तेव्हा मात्र तेच विद्यार्थी पूर्णतः मौन बाळगतात. त्यापैकी एकाच्याही तोंडून जयजयकार निघत नाही! या सर्वजणांची भूमिका एक सारखी आहे असे म्हणावे का? अर्थातच नसणार. पण राष्ट्रनेत्याचा जयजयकार करण्यासही सहजासहजी तयार होणारी ही पिढी नाही हे निश्चित. हा व्हिडिओ भारतातील युवा पिढीचे नक्कीच प्रतिनिधित्व करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी अन्य कोणत्या नेत्याच्या जयजयकाराच्या जरी घोषणा दिल्या असल्या तरी त्यांचा प्रतिसाद तितकाच थंड असता. याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. नवी पिढी कशा पद्धतीने विचार करते, त्याचे हे द्योतक आहे. या पिढीच्या जन्मदात्यांची विचार करण्याची पद्धत आणि या मुलांची पद्धत यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. कारण, त्यांचे जग पूर्वीच्या जगापेक्षा वेगळे होत चालले आहे. ते सहजासहजी कोणाला आपल्या डोक्मयावर बसवून घ्यायला तयार नाहीत. केवळ राजकीय नेत्यांच्या बाबतीत त्यांची भूमिका अशी आहे, अशातला भाग नाही. त्यांच्या काळातील चित्रपटअभिनेते सुद्धा इतकेच नव्हे तर अभिनेत्री सुध्दा दीर्घकाळ टिकाव धरणे शक्मय राहिलेले नाही. गेल्या पिढीचे नायक पन्नाशीत, साठी पोचले तरीही चित्रपटात नायक म्हणूनच काम करतात. तेच नायक म्हणून त्या पिढीला आवडतात. मात्र नव्या पिढीला एकच एक नायक किंवा त्याच त्या पठडीतील भूमिका सुद्धा मान्य नाहीत. ते त्यातील कोणालाही डोक्मयावर घ्यायला तयार नाहीत. कोणालाही आपल्या पिढीचा नायक मानायला तयार नाहीत. आठ दिवसाच्या आत अशा प्रत्येक नायकाचा चित्रपट डब्यात जातो! पिढय़ानपिढय़ा त्याच त्या कुटुंबाला निवडून देणारी पिढी एका बाजूला तर प्रत्येक निवडणुकीत वेगळा विचार करणारी युवापिढी वेगळय़ा बाजूला अशी विभागणी करण्याची वेळ आली आहे. केवळ व्यक्तीच्या बाबतीतच नव्हे तर वस्तूंच्या आणि प्रसाधनांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या एकच एक अशा विशिष्ट धारणा नाहीत. ठराविक ब्रँडलाच पसंती अशी नि÷ा ते व्यक्त करत नाहीत. आपल्या हिताची आणि आपल्या आवडीनिवडीला साजेशी वस्तू कुठे मिळेल याचा विचार ते सहजपणाने करतात. तितक्मयाच सहजपणे त्याला स्वीकारतात आणि नाकारतात सुद्धा! एखादी वस्तू आवडली तर त्याचे खुल्या मनाने कौतुक करतात. आवडले नाही तर का नाही आणि काय सुधारणा हवी याचा अभिप्राय देताना कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. अशा ग्राहकांच्या मनाला जपण्याची जबाबदारी आता वस्तू आणि सेवांच्या उत्पादकांवर येऊन पडली आहे. आपण खरेदी करत असलेल्या वस्तू बद्दल इतरांचे काय मत आहे, हे ते इंटरनेटवर जाऊन जाणून घेतात. आपण मोजत असलेला पैसा योग्य कारणासाठी खर्च पडेल किंवा नाही याची त्यांना खात्री हवी असते. त्यात जर फसगत झाली तर ते अशा उत्पादकांची बदनामी करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. बदलत्या काळाचा हा प्रभाव आहे. यापूर्वी ग्राहकांचे हित आणि हक्कांसाठी जागृती करणे ही जबाबदारी वाटून सरकारला जागो ग्राहक सारखे अभियान राबवावे लागत होते. आज हे काम सहजावरी होऊ लागले आहे. चित्रपट पाहण्यापूर्वी सुद्धा रिव्ह्यू पाहून या चित्रपटाला जायचे किंवा नाही हे ही पिढी ठरवते. आयुष्यभर एकच अभिनेता आणि अभिनेत्रीची भक्ती करणारी पिढी आता अस्ताच्या दिशेने चालू लागली आहे. त्याच काळात आपण जननायक मानतो त्यांची सुद्धा खिल्ली उडवून त्यांच्या अभिनयाची चिकित्सा करणारी नवी पिढी आहे. या बदलांना स्वीकारणे एका पिढीला सहज शक्मय होत नाही. त्याचा परिणाम पिढय़ांमधील वैचारिक संघर्षातूनही दिसतो. मात्र कोणी आपल्या बाबत काय विचार करतो, याची फिकीर करायलाही ही पिढी तयार नाही. हे बदल पचायला थोडे अवघड असले तरी त्यातून काही चांगलेच घडेल याची खात्री बाळगायला मात्र हरकत नाही.
Ghaziabad: Union Minister of State for Defence Ajay Bhatt welcomes Indian nationals, evacuated from crisis-hit Ukraine, upon their arrival at the Hindon Air Force Station in Ghaziabad, early Thursday, March 3, 2022. As part of Operation Ganga, the first IAF C-17 Globemaster aircraft carrying 200 passengers, mostly students returned to Hindan airbase near Delhi, from Bucharest at around 1:00 AM. (PTI Photo/Ravi Choudhary) (PTI03_03_2022_000018B) *** Local Caption ***








