अत्यंत गुप्तपणे चालली होती रशियाची तयारी
रशिया आणि युक्रेनवर अचानक हल्ला केला, अशी जगातील अनेकांची समजूत असली तरी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे या हल्ल्याची तयारी गेल्या किमान आठ वर्षांपासून करीत होते, असे स्पष्ट होत आहे. त्यांनी एक अत्यंत गुप्त योजना आखली होती. ती केवळ त्यांच्या अत्यंत विश्वासू अशा दोन-तीन सहकाऱयांनाच माहीत होती. रशियाने युपेनवर हल्ला केल्यास अमेरिका व पश्चिम युरोपीय राष्ट्रे स्वस्थ बसणार नाहीत, याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आधीच अनेक पर्यायी योजनाही आखून ठेवल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनवर ताबा मिळविणे हे त्यांचे ध्येय आहे, असे आता उघड होत आहे.
1990 च्या दशकात रशियाचे विघटन झाले आणि अनेक राष्ट्रे रशियापासून स्वतंत्र झाली. रशियाच्या अशा विघटनाला पुतीन यांचा प्रारंभापासून विरोध होता. रशियातील सत्ताधारी कम्युनिस्टांच्या दुर्लक्षामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे रशियाला आपले महत्त्वाचे गमवावे लागले याची खंत पुतीन यांना आहे. त्यामुळेच त्यांनी राजकारणात महत्त्वाची भूमिका घेऊन रशियाची सत्ता हातात घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. ती यशस्वी झाल्यानंतर आता ते ध्येयपूर्तीच्या दिशेने कार्य करीत आहेत. प्रथम त्यांनी सात वर्षांपूर्वी क्रिमियावर ताबा मिळविला. त्यानंतर युपेनवरील हल्ल्याची अंतिम योजना सज्ज केली, असे त्यांच्या काही निकटवर्तियांचे म्हणणे आहे. युक्रेन आणि बेलारुस हे पूर्वी रशियाचेच भाग होते. त्यांना पुन्हा रशियात समाविष्ट करण्याचे पुतीन यांचे प्रथमध्येय आहे. रशियापासून अलग झालेल्या सर्व देशांचे एक कॉन्फडरेशन असावे आणि त्याचे नेतृत्व रशियाकडे असावे, ही पुतीन यांचे महत्त्वाकांक्षा असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षेला नाटोच्या सदस्य देशांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे भविष्यातही युपेनसारखे संघर्ष होत राहण्याची शक्मयता आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
हे आक्रमण नव्हे
युक्रेन हा रशियाचाच भाग असून रशियाचे येथील अस्तित्व प्रारंभापासूनचे आहे. त्यामुळे सध्याची कृती हे आक्रमण नसून रशियाने घेतलेली मिलिटरी ऍक्शन आहे, असा प्रचार रशियाकडून केला जात आहे. युपेन आणि रशिया संघर्षामध्ये अन्य कोणत्याही देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसून हा रशियाचा अंतर्गत प्रश्न आहे, अशीही भूमिका पुतीन यांनी गेली अनेक वर्षे मांडली आहे. रशियाचा उद्देश युक्रेनवर कब्जा करणे हा नसून केवळ युक्रेनला आपल्या कहय़ात ठेवणे हा आहे, हे दाखविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केला असूनही पाश्चात्य देश अद्यापही थंडा प्रतिसाद देत असल्याचे दिसते.
कोणत्याही प्रकारे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशी विश्वसमुदायाची इच्छा आहे. या युद्धामुळे कच्चे तेल व इतर वस्तूंच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था संकटग्रस्त झाली असल्याने या युद्धावर तोडगा निघावा, अशी सार्वत्रिक इच्छा असली तरी पुतीन यांनी मनावर घेणे आवश्यक आहे. तरच हा संघर्ष थांबेल, असेही मत जगभरात व्यक्त होत आहे.








