वृत्तसंस्था/ चित्तगाँग
अफगाण क्रिकेट संघाने सोमवारी झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात यजमान बांगलादेशचा 7 गडय़ांनी पराभव करत या मालिकेत आपला व्हाईटवॉश टाळला. बांगलादेशने तीन सामन्यांची ही वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव 46.5 षटकांत 192 धावांत आटोपला. अफगाणच्या रशीद खानने 37 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर अफगाणने 40.1 षटकांत 3 बाद 193 धावा जमवित विजय नोंदविला. अफगाण संघातील गुरबाजने 110 चेंडूत नाबाद 106 झळकविल्या. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने 4 गडय़ांनी तर दुसरा सामना 88 धावांनी जिंकला होता. आता उभय संघात 3 आणि 5 मार्च रोजी टी-20 चे दोन सामने खेळविले जातील.









