कुंभोज / वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले येथे आठवडी बाजारात चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले असून, आज दि. 27 फेब्रुवारी रोजी कुंभोज आठवडी बाजारातुन पूजा लखन सपकाळ या महिलेची दागिन्यांची पर्स व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली. आज रविवार असल्याने कुंभोज आठवडी बाजारात कुंभोज परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी विक्रीसाठी बाजारात येत असतात.
परिणामी गेल्या दोन वर्षापासून कुंभोजच्या बुधवार व रविवारच्या आठवडी बाजारात मोबाईल व दागिने चोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून काही वेळा चोरट्यांना नागरिकांनी जेरबंद केले आहे.. परिणामी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिली तरी त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नाही .सदर आठवडी बाजारात पोलीस संरक्षण देण्याची मागणी ही कुंभोज ग्रामस्थांचा तुन हातकणंगले पोलिसांना करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पूजा लखन सपकाळ कुंभोज ह्या आठवडी बाजारात गेल्या होत्या त्यांनी आपल्या कानातील काही दागिने व रोख रक्कम आपल्या पर्स मध्ये ठेवली होती, काही बाजार घेण्यासाठी ते एका ठिकाणी बसले असता त्यांना आपली पर्सन चोरट्याने चोरून नेल्याची समजले यामध्ये त्यांच्या कानातील कर्णफुले व रोख रक्कम एक हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती, सदर मदु मालाची रक्कम जवळजवळ वीस हजार रुपये इतकी होत असून चोरट्यांनी आज बाजारात चांगला डल्ला मारला. सदर चोरट्यांचा बंदोबस्त हातकणगले पोलिसांनी करण्याची मागणी बाजारात येणाऱ्या पंचक्रोशीतील नागरिकांच्यातून होत आहे.