लेबनॉनच्या विदेश मंत्रालयाने युक्रेनवरील हल्ल्याची निंदा केली आहे. लेबनॉनमधील विदेश मंत्रालयाने यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. लेबनॉनच्या या भूमिकेने आम्हाला धक्का बसला आहे. रशियाने लेबनॉनचा विकास आणि स्थैर्यासाठी मोठे योगदान दिले आहे, परंतु याप्रकरणी लेबनॉनने तटस्थ राहण्याचे धोरण सोडून रशियाला विरोध केला असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.
लेबनॉनने युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची निंदा केली होती आणि रशियाल स्वतःची सैन्य कारवाई त्वरित रोखण्याचे आवाहन केले होते.
अमेरिका, नाटो जबाबदार ः व्हेनेझुएला
व्हेनेझुएलाने युक्रेन संकटासाठी नाटो आणि अमेरिकेला जबाबदार ठरविले आहे. नाटो आणि अमेरिकेने डोनबासमधील संघर्ष संपविण्यासाठी करण्यात आलेल्या 2014 च्या मिन्स्क कराराचे उल्लंघन केले, याचमुळे हे संकट उभे ठाकल्याचे व्हेनेझुएलाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
श्रीलंका राहणार तटस्थ
रशिया आणि युक्रेनमधील सैन्य संघर्षात श्रीलंका तटस्थ राहणार आहे. आम्ही युक्रेनमधील स्थिती पाहत आहोत. या संघर्षामुळे श्रीलंकेवर गंभीर आर्थिक परिणाम होणार आहे. आम्हाला आमचे इंधन आणि गॅससाठी अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. आमच्या चहापावडरची बाजारपेठ प्रभावित होणार आहे. तरीही आम्ही कुणाचीच बाजू घेणार नसल्याचे श्रीलंकेचे विदेश सचिव जयनाथ कोलंबेज यांनी म्हटले आहे.









