भारतासह अनेक देशांमध्ये महागाईचा भडका उडणार
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांनी युपेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा करताच भारतासह जगभरातील शेअर बाजारांची मोठी घसरण झाली. सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून कच्च्या तेलाच्या किमतीने शंभरीपार झेप घेत 103 डॉलर्स प्रतिबॅरलचा टप्पाही पार केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने मालवाहतुकीवर होणारा खर्च वाढेल आणि भाज्या, फळांसह दैनंदिन वस्तूंची महागाई वाढेल, त्याचा थेट परिणाम भारतीयांच्या खिशावर होईल. अशास्थितीत रशिया-युक्रेन संघर्ष अधिक दिवस वाढत गेल्यास महागाईचा विळखा अधिक घट्ट होऊ शकतो.
विद्युत वस्तू, यंत्रसामुग्री
बहुतांश इलेक्ट्रिक (विद्युत) वस्तू आणि यंत्रसामुग्रीसह मोबाईल-लॅपटॉपसाठी भारत इतर देशांकडून आयातीवर अवलंबून आहे. बहुतेक मोबाईल आणि गॅझेट्स चीन आणि इतर पूर्व आशियाई शहरांमधून आयात केले जातात आणि बहुतेक व्यवसाय डॉलरमध्ये केले जातात. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 102 पैशांची मोठी घसरण झाली. युद्धाच्या काळातही रुपयाची अशीच घसरण होत राहिल्यास देशात आयात महाग होईल. साहजित अन्य देशांमधून आयात होणारे मोबाईल आणि इतर गॅजेट्सवर अतिरिक्त दर आकारले जाऊ शकतात.
खाद्यतेल आणि खते…
युपेन हा सूर्यफूल तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. भारतही युपेनमधून मोठय़ा प्रमाणात खाद्यतेल आयात करतो. भारताबाबत बोलायचे झाले तर खाद्यतेलाचे भाव गेल्या काही काळापासून गगनाला भिडले असून युद्धामुळे पुरवठा बंद झाल्यास त्याच्या किमती भडकण्याची शक्मयता आहे. याशिवाय रशिया भारताला अनेक धान्योत्पादने पुरवत असल्यामुळे युद्धाच्या स्थितीत त्याच्या आयातीलाही अडथळा येऊ शकतो. तसेच युरियासह अन्य खतांच्या पुरवठय़ातही व्यत्यय आल्यास शेतकऱयांवर आणि कृषी उत्पादनांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्र
ऑटोमोबाईल क्षेत्रावरही युपेनचा प्रभाव बऱयापैकी आहे. युपेनमध्ये पॅलेडियम आणि निऑन या विशेष सेमीकंडक्टर धातूचे उत्पादन होते. साहजिकच या धातूंच्या उत्पादनावर परिणाम होऊन सेमीकंडक्टर टंचाईचे हे संकट आणखी वाढणार आहे.
पेट्रोल-डिझेल इंधन
युद्ध पुढे सरकल्यास कच्च्या तेलाची किंमत 120 ते 150 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकते. आंतरराष्ट^ाrय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत एक डॉलरने वाढली तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 50 ते 60 पैशांनी वाढ होते. अशा स्थितीत उत्पादन घटल्याने आणि पुरवठय़ात व्यत्यय आल्याने त्याची किंमत निश्चितच वाढणार असून कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 150 डॉलरवर पोहोचल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 ते 15 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.









