बेंगळूर प्रतिनिधी
शिवमोग्गा येथील मॅकगॅन हॉस्पिटलच्या अपघातग्रस्त विभागात संतप्त जमाव तलवारी घेऊन घुसल्याने तीन मुस्लिम कुटुंबाला एका खोलीत दडवून ठेऊन मॅकगॅन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवून मोठा अनर्थ टऴला. रविवारी संध्याकाळी बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष यांच्या हत्येनंतर जातीय तणाव वाढल्याने वातावरण गंभिर झाले आहे. रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जमावापासून त्यांचे प्राण वाचले.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या सांगितल्यानुसार, जमावातील एका व्यक्तीने हर्षाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी करत ड्युटी डॉक्टरवर तलवार म्यान केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खचले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेची भीती वाटल्याने मुस्लिम कुटुंब जवळपास पाच तास खोलीत लपले होते. डॉक्टरांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.









