वार्ताहर /धामणे
धामणे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि माता-पिता पूजन असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्राम पंचायत सदस्य कोनेरी बाळेकुंद्री आणि शाळेच्या उपाध्यक्षा शोभा रेमाणाचे यांनी केले. योग वेदांत सेवा समितीचे सदस्य संजय घोरपडे व अनिल मोदगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे माता-पित्यांचा आदर ठेवून स्वराज्य घडविले त्याचप्रमाणे सर्वांनी माता-पित्यांचा आदर करणे आवश्यक असल्याचे सांगून उपस्थित माता-पित्यांचे पूजन विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. त्यानंतर एसडीएमसी अध्यक्ष दीपक बाळेकुंद्री यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग यावेळी सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला नारायण पाटील, सुरेखा तारीहाळकर, सुनील धर्मुचे, मोहन चौगुले, बसवंत पाटील, सुकन्या पाटील, शिक्षक ए. एस. हुद्दार, एन. आर. बागेवाडी, एस. आर. घाडी, के. एस. कदम, एम. आर. तालेकर, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे माता-पिता या कार्यक्रमाला उपस्थित होते. बी. एस. चव्हाण यांनी आभार मानले.









