चंदगड संघाला उपविजेतेपद, डीवायएसएस अ संघ तिसऱया स्थानावर; दर्शन हिप्परगी उत्कृष्ट खेळाडू
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
जे. पी. स्पोर्ट्स पीरनवाडी आयोजित शिवजयंती निमित्त निमंत्रितांच्या शिवराय चषक व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीवायएसएस ब संघाने चंदगड संघाचा 2-1 असा पराभव करून शिवराय चषक पटकाविला. डीवायएसएस अ संघाला या स्पर्धेत तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून दर्शन हिप्परगी याला गौरविण्यात आले.
पीरनवाडी येथे शिवजयंतीनिमित्त व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे परशराम राऊत, नारायण मुचंडीकर, सुरी पाटील, बबन नेसरकर आदी मान्यवरांच्या हस्ते नेटवरील चेंडूचे फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 22 संघानी भाग घेतला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात चंदगड (महाराष्ट्र) संघाने डीवायएसएस संघाचा 25-17, 19-25, 16-14, अशा सेटमध्ये तर दुसऱया उपांत्य सामन्यात डीवायएसएस बी संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 25-18, 25-13 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱया क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात डीवायएसएस अ संघाने मराठा वॉरियर्सचा 25-17, 25-12 अशा सेटमध्ये पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला. अंतिम सामन्यात डीवायएसएस बी संघाने चंदगड संघाचा 25-18,
21-25, 15-10 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सचिन गोरले, सुरी पाटील, महेश यलजी, इम्रान मुजावर, परशराम राऊत, अमर आपटेकर, सुनील पाटील, नारायण मुचंडीकर, बबन नेसरकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या डीवायएसएस बी संघाला 7 हजार रूपये व आकर्षक चषक, उपविजेत्या चंदगड संघाला 5 हजार रूपये व चषक, तिसऱया क्रमांकाच्या डीवायएसएस अ संघाला 3 हजार रूपये व चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट डिफेंडर म्हणून हर्षवर्धन कानेकर चंदगड, उत्कष्ट स्मॅशर दर्शन हिप्परगी, अष्टपैलू खेळाडू महेश गुरव तर अष्टपैलू खेळाडू दर्शन हिप्परगी यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून हर्षवर्धन शिंगाडे, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रितेश मालूचे, तुषार पाटील, राकेश नाईक, अभि गोर्डेश्वर, श्रीधर पाटील आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.









