ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ या बंगल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयानं महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिले आहेत. त्यामुळे राणे यांच्या या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे.
मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा नीलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ऑगस्ट 2021 मध्ये केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राणे यांच्या या बंगल्यावर कोणत्याही क्षणी हातोडा पडू शकतो. राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.









