ऑनलाईन टीम / तरुण भारत
गडचिरोली आणि आसपासच्या परिसरीसरात नक्षवाद्यांचा असणारा वावर आणि यातुन होणारा शासनव्यवस्थेविरुद्ध नक्षवादी हा प्रकार कित्येक वर्षे असंच आहे. यातुन मग शासनव्यवस्थेला झुकवण्यासाठी नक्षलवादी हिंसक मार्गांचा अवलंब करतात. आणि यासाठीच आवश्यकता असते ती शस्त्रास्त्रांची ही आवश्यकता पुर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी छोटी – मोठी प्रलोभने दाखवत नक्षलवादी समर्थकांना हाताशी धरत हे पर्याय अवलंबले जातात. याच पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
पोलीसांनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा भंगारामपेठा या गावात पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तिसगड येथे वाहतुक करीत असलेल्या ४ व्यक्तींकडून १० नग कार्डेक्स वायरचे ३५०० मीटर लांबीचे बंडल व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यावेळी केलेल्या कारवाईत राजु गोपाल सल्ला, (वय ३१, करीमनगर, तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय २४, भंगारामपेठा ता. अहेरी), साधु लच्चा तलांडी (वय ३०), मोहम्मद कासिम शादुल्ला (रा. एनटीआर तामिल कॉलनी, बाबुपेठ, आसिफनगर, तेलंगणा), छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे (रा. भंगाराम पेठा ता. अहेरी) यांना पकडण्यात पोलीसांना यश आले असुन एक आरोपी फरार झाला आहे. नक्षल समर्थकांकडुन जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे बीजीएल, हँडग्रेनेड, जप्त केला आहे. याचा वापर बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो. येत्या टिसीओसी सप्ताहात या स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार होता अशी माहिती आत्तापर्यंत मिळाली आहे.








