राधानगरी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारा 2020,2021 सालचा यशवंत ग्राम सरपंच पुरस्कार राधानगरीच्या इतिहासात पहिल्यांदाच राधानगरी ग्रामपंचायतला प्रदान करण्यात आला.
गेल्या पाच वर्षात लोकनियुक्त सरपंच कविता शेट्टी, सर्व विद्यमान ग्रा प सदस्य, व ग्रामपंचायतने स्थानिक पातळीवर उत्कृष्ट काम करून व विविध प्रकारचे उपक्रम राबविले,या कार्याची दखल घेत व गावाचा विकास कामाचा चढता आलेख पाहून त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आम, क्रूतुराज पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच कविता शेट्टी व उपसरपंच संतोष टेपुगडे यांना यशवंत ग्राम सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ग्रा. पं, सदस्य मिथुन पारकर, सचिन पालकर, महेश अडसूळ, रामराव टेपुगडे, भारती कुंभार, आनंदी पाटील यांच्यासह ग्रामविकास अधिकारी एम आर गुरव, दीपक शेट्टी, युवराज पाटील आदी उपस्थित होते, या पुरस्कारासाठी सर्व ग्रा प सदस्य, शहरवासीय, शहर विकास आघाडीचे नेतेमंडळी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले अशी माहिती सरपंच कविता शेट्टी यांनी दिली.