भाविकांकडून मदतीचे आवाहन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर-हलकर्णी-बाचोळी गावच्या सीमेवर असलेल्या ग्रामदेवता मऱयाम्मा मंदिर जीर्णोद्धाराचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मंदिरात ग्रॅनाईट बसवण्याचे कामही आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेबरोबरच दि. 14 एप्रिल 2022 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यापूर्वी म्हणजे 31 मार्चपर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याचा निर्णय मऱयाम्मा मंदिर जीर्णोद्धार कमिटीने घेतला आहे. या मंदिरात रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी मंदिर बांधकाम कमिटीचे सदस्य विठ्ठल हळदणकर यांनी स्वागत केल्यावर बांधकाम कमिटीचे अध्यक्ष तमाण्णा गावडे यांनी प्रास्ताविक करून आतापर्यंत मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात झालेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी आनंद देसाई, नारायण गुरव, परशराम भिरसे, दत्ता भरमाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मऱयाम्मा देवी पूजन अलोक वागळे, प्रथमेश पाटील यांच्या हस्ते तर गाभाऱयातील ग्रॅनाईट फरशी पूजन उद्योजक परशराम कलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या नागसर्पाचे पूजन सदानंद नागनूर, धनंजय पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच मंदिराच्या कळसाकडे जाणाऱया शिडीचे पूजन बिल्डींग कॉन्ट्रक्टर विठ्ठल साळुंखे व रविंद्र गुरव यांनी केले. यानंतर उपस्थितांची भाषणे झाली. बांधकाम कमिटी सदस्य कृष्णा कुंभार यांनी आभार मानले.
याप्रसंगी मंदिराच्या बांधकामासाठी गणपती सिद्धाप्पा जाधव समोरील स्टील ग्रीलसाठी 21,000 रु., पांडुरंग महादेव बिडीकर शटरसाठी 25,501 रु., परशराम लक्ष्मण भिरसे, रविंद्र गणपती गुरव, मोहन कल्लाप्पा चौगुले यांनी प्रत्येकी रु. 5555, नारायण दत्तात्रय गुरव, विठ्ठल नारायण साळुंखे यांनी प्रत्येकी रु. 5151, दत्ता भरमाणी गुरव, सदानंद इराप्पा नागनूर यांनी प्रत्येकी रु. 5051, गोपाळ कलाप्प्पा अल्लोळकर, वैशाली सुनिल सावंत यांनी प्रत्येकी रु. 5001, प्रथमेश प्रभाकर पाटील 5000, आनंद महेंद्र देसाई, बाळू चापगावकर यांनी प्रत्येकी रु.2500, धनंजय मऱयाप्पा पाटील 2051, संभाजी वासुदेव हलगेकर दोन समई, अर्जुन गंगाराम भालकेकर 5 पोती सिमेंट याप्रमाणे देणग्या जाहीर झाल्या. या कार्यक्रमाला मऱयाम्मा मंदिर बांधकाम कमिटीच्या सर्व सदस्यांबरोबरच खानापूर, हलकर्णी, गांधीनगर, शिवाजीनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.









