शेकडोंच्या संख्येत लगार्तोस बायोस्फीयर रिझर्व्हमध्ये ठोकला तळ
मेक्सिकोच्या युकातन बेटाच्या रिया लगार्तोस बायोस्फीयर रिझर्व्हमध्ये सध्या शेकडो कॅरेबियन फ्लेमिंगोंनी तळ ठोकला आहे. हे फ्लेमिंगो या अभयारण्यात ब्रीडिंग करतात. त्यांचे वैज्ञानिक नाव फीनिकोप्टेरस रुबर आहे. युकातन बेटामध्ये वर्षभर हजारो कॅरेबियन फ्लेमिंगो राहतात, परंतु स्वतःच्या ब्रीडिंगसाठी ते स्वतःचे ठिकाण बदलतात. सेलेस्टन बायोस्फीयर रिझर्व्ह कॅरेबियन फ्लेमिंगोंच्या ब्रीडिंगसाठी पसंतीचे ठिकाण आहे.

मेक्सिकोच्या 8 हजार चौरस किलोमीटर किनारी क्षेत्रात 2 वेटलँड 1979 मध्ये विशेषकरून या फ्लेमिंगोंना संरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आले होते. रिया लगार्तोस रिझर्व्ह 55,350 हेक्टरमध्ये तर रिया सेलेस्टिन रिझर्व्ह 59,130 हेक्टरमध्ये फैलावलेले आहे.
या प्रयत्नांमुळेच फ्लेमिंगोंची संख्या 1954 मध्ये 6057 च्या नीचांकी स्तरावरून वाढत 1998 मध्ये 27,000 पर्यंत पोहोचली होती. सध्या ही संख्या आता अधिकच वाढली असल्याचे मानण्यात येते. फ्लेमिंगोंवर झालेल्या अध्ययनानुसार त्यांचा 55 टक्के वेळ भोजनाच्या शोधात जात असतो. तर शिकार करण्यास 18 टक्के वेळ देतात. केवळ 12 टक्केच आराम करत असतात.









