असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजीनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे यांची माहीती
कोल्हापूर प्रतिनिधी
असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजीनिअर्स, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने ‘बिल्डो 2022' हे बांधकामविषयक प्रदर्शन 4 ते, 7 मार्चअखेर हॉटेल पॅव्हेलीयन येथे भरवण्यात येणार आहे. सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. अशी माहीती असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजीनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनामध्ये इमारत बांधकाम, अंतर्गत सजावट, बांधकाम क्षेत्रातील उपकरणे, यंत्रसामुग्री, गृहफायनान्स , मिळकतीच्याबाबतची माहिती, यांचा समावेश असणार आहे. एकाच छताखाली ही सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने या क्षेत्रातील उत्पादक, वितरक, विक्रेते, यांच्याबरोबरच सामान्य नागरिक तसेच तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्याच्या दृष्टीने ही हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थंडावलेल्या बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था येत आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित असलेले गृहप्रकल्प जोमाने साकारणार आहेत.
असोसिएशन ऑफ अर्कीटेक्टस अँड इंजीनिअर्स, कोल्हापूर ही संस्था बांधकाम क्षेत्रातील कोल्हापूर जिह्यातील सर्वात जुनी संस्था आहे. कोल्हापूर शहर व जिल्हा परिसरात तांत्रिक क्षेत्रातील सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व पेललेले आहे. कोल्हापूर जिह्यातील सुमारे 500 आर्कीटेक्टस व इंजीनिअर्स या संस्थेचे सभासद आहेत. या सभासदांना संघटीत करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करून, त्यांना पाठबळ देऊन बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्ता आणण्याच्यादृष्टीने संस्थेची गेली 50 वर्षापासून वाटचाल सुरु आहे. यासाठी सेमिनार, लेक्चर्स, प्रदर्शने असे उपक्रम घेतले जात असतात. कोल्हापूर शहर रस्ते प्रकल्पाचे फेरमुल्यांकन, कोल्हापूर जिह्याची प्रादेशिक योजना, क्षेत्र विकास प्राधिकरण, नुकताच येऊ घातलेला कोल्हापूर शहराचा विकास आराखडा, कोल्हापूर महानगरपालिकेची विकास नियंत्रण नियमावली याबाबत या असोसिएशनने फार मोठे योगदान दिलेले आहे.
असोसिएशनने सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे. बिल्डो 2022 च्या प्रदर्शनामध्ये स्मरणिका ही प्रकाशित केली जाणार आहे. या प्रदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बरोबरच देशातील नामांकित उत्पादक कंपन्या सहभाग घेणार आहेत. या प्रदर्शनाला आयकॉन स्टील ही नामाकित कंपनी प्रायोजक आहे. या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन अजय कोराणे यांनी केले आहे.
पत्रकार परिशादेस राज डोंगळे, रवी माने,विजय चोपदार,जयंत बेगमपुरे,निशांत पाटील,उमेश कुंभार,उदय निचिते,संदिप आवटी विशाल भाले आदी अपस्थित होते.