माजी खासदार राजू शेट्टी यांचे आव्हान
कबनूर वार्ताहर
सक्तीची वीज तोडू उसाचा दुसरा हप्ता दोनशे रुपये प्रमाणे त्वरित द्यावे यासह अन्य मागण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अविरतपणे लढा सुरू आहे.शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवार ता.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.त्या मोर्चा संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत राजू शेट्टी हे अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.
रासायनिक खते,कृषी साहित्य व पशु खाद्य दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.असे सांगून माजी खासदार श्री.शेट्टी म्हणाले,उसाचा दुसरा हप्ता दोनशे रुपये त्वरित द्यावा,रासायनिक खते,कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ तात्काळ मागे घ्यावी,सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून तसेच दहा तास दिवसाची वीज द्यावी,भूमि अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करावा,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान सत्वर द्यावे.या मागण्यांसाठी आयोजित धडक मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.
स्वागत व प्रास्ताविक धूळगोंडा पाटील-धुळुसे यांनी केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य जयकुमार कोले,जिल्हा कार्याध्यक्ष रमेश भोजकर यांची भाषणे झाली