अक्कलकोट प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे करजगी हद्दीत पांढऱ्या रंगाचे अशोक लेलँड या कंपनीचे पिकअप वाहनांमध्ये बेकायदेशीर, विनापरवाना वाळू वाहतूक करताना पोलिसांनी 1 ब्रास वाळूसह पिकअप गाडी ताब्यात घेतली असुन गाडीचा चालक पळून गेला. पोलिसांनी पाच लाख सात हजार चा मुद्देमाल जप्त केला. याची दक्षिण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिली अधिक माहिती अशी की याची फिर्याद पोना जगदिश नेमीनाथ राठोड नेमणुक अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे यानी दिली. संशयित आरोपी असलेले वाहनाचा चालक व मालक फरार आहेत. मौजे करजगी ता अक्कलकोट गावाचे शिवारात करजगी ते कल्लहिप्परगे जाणारे रोडवर एक पांढरे रंगाचा पिकअप वाहन येत असलेली पोलिसांनी दिसली. त्यावेळी पोलिसांनी पिकअप वाहनाचा संशय आल्याने वाहन थांबविण्यास सांगितले असता वाहनावरील चालकाने वाहन लांब थांबवुन शेतातील पिकात पळुन गेला. नंबरप्लेट नसलेल्या पिकअप वाहनाच्या पाठीमागील हौदात वाळु मिळून आली.
वाहनांची किंमत पाच लाख रुपये व एक ब्रास वाळूची किंमत 7000 रुपये असे सुमारे पाच लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वाहनचालक व मालक यांनी संगनमत करून कोणत्यातरी नदी पात्रातुन बेकायदेषिररित्या,विनापरवाना,स्वतःचे आर्थिक फायदयाकरीताअवैध्यरित्या वाळु चोरून भरून वाहतुक करीत असल्याबद्दल वाहन चालक व मालकावर दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.