सावंतवाडी/प्रतिनिधी-
तळवणे – भटवाडी येथील अनिरुद्ध ( दादा ) विश्राम परुळेकर (26) या तरुणाने कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
अनिरुद्ध उर्फ दादा परुळेकर बेंजो पार्टी चालवीत होता. खाजगी वाहन चालक म्हणूनही तो काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी त्याने कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी बांबोळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बांबोळी हॉस्पिटलमध्ये त्याचे निधन झाले. दादा परुळेकर याच्या निधनमुळे तळवणे येथील क्रिकेट स्पर्धा व महिलांचा क्रिकेट सामना रद्द करण्यात आला. पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.