Pranic Healing ही एक पूरक उपचार पद्धती आहे. मास्टर चोआ कॉक सुई यांनी या ऊर्जाप्रणालीचा शोध लावला. यात त्यांनी Pranic Healing आपण फक्त आजार बरे करण्यासाठी न वापरता आपल्या जीवनशैलीत त्याचा उपयोग कसा करू शकतो यावर अभ्यासक्रम तयार केला आहे. आपली ऊर्जा, आपल्या घराची ऊर्जा, आपल्या आजुबाजूचे वातावरण आपण संतुलित कसे ठेऊ शकतो हे त्यांनी Pranic Healing च्या माध्यमातून सांगितले आहे. लेखमालेच्या माध्यमातून Pranic Healing बऱयाच लोकांपर्यंत योग्यपणे पोहोचलेलं आहे. तरीही वाचकांना बरेच प्रश्नदेखील पडतात. आज pranic healing संदर्भात वाचकांना जे प्रश्न पडलेत ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
1.विश्वासावर आधारित प्राणिक उपचार आहेत का? आपण बरे व्हाल असा विश्वास आहे म्हणून आपण बरे होतो असं काही आहे का?
परिणाम पाहिल्यावरच तुमच्यात विश्वास निर्माण होऊ लागतो. एका healing मध्ये त्याच्या पायाचे दुखणे निम्मे कमी होते. काही दिवस उपचार घेतल्यावर तो पूर्ण बरा होतो किंवा एखादा sugar असलेला पेशंट शेवटच्या appointment ला मिठाई घेऊन येतो, तेव्हा Pranic Healing वरचा विश्वास अधिक दृढ होतो. तुम्हाला विश्वासाची गरज नाही पण खुल्या मनाची गरज आहे. कारण तुम्ही मनापासून जेव्हा त्या ऊर्जेचा स्वीकार कराल तेव्हाच ती ऊर्जा तुमच्या शरीरावर काम करेल.
2.उपचार कार्य करत नाही.
बरे करणारा केवळ 20 टक्के उपचारांसाठी जबाबदार असतो, 80 टक्के रुग्ण स्वतःच जबाबदार असतो. रुग्ण ग्रहणक्षम (receptive) आहे का? रुग्णाला बरे करणाऱयाने शिफारस केलेल्या सूचना आणि जीवनशैलीतील बदलांचे पालन रुग्ण करत आहेत का? या सर्व गोष्टी उपचारात महत्वाच्या ठरत असतात. उपचार देणारा हा एक माध्यम म्हणून काम करत असतो. उपचार देणाऱयाला उपचार देण्याआधी जशा काही सूचना पाळाव्या लागतात त्याचप्रमाणे रुग्णालासुद्धा काही सूचनांचे पालन करावे लागते.
गेल्या काही लेखात एखादे दुखणे हे फक्त शारीरिक नसून त्याचा मानसिक स्वास्थ्याशी सुद्धा संबंध येत असतो हे आपण सविस्तर पाहिले आहे. एखादे दुखणे हा एखाद्याबद्दलचा जो साचलेला राग आहे त्यामुळे सुद्धा असू शकते किंवा एखाद्या तणावामुळे सुद्धा असू शकते. अशाबाबतीत फक्त Pranic उपचार घेऊन चालत नाहीत तर पेशंटने लवकर बरे होण्यासाठी त्याला ज्यांनी त्रास दिलाय त्या लोकांना चांगल्या मनाने माफ करणे गरजेचे असते. तणावमुक्तीसाठी संतुलित श्वसन किंवा ध्यान केले पाहिजे. उपचार प्रभावीपणे काम करण्यासाठी उपचारकाइतकाच रुग्णही बरे होण्याकरीता जबाबदार असतो.
3.डॉक्टरकडे जाण्याची वेळ कधी येते का ?
डॉक्टरी उपचार आणि प्राणिक उपचार दोन्ही वापरण्याची शिफारस केली जाते. एक दुसऱयासाठी पर्याय नाही. अनेक डॉक्टरही आताशः रुग्णांना प्राणिक उपचार करण्याची शिफारसदेखील करतात. जेव्हा भौतिक शरीर आणि ऊर्जा शरीर दोन्ही शरीरांना आवश्यक उपचार प्राप्त होतात तेव्हा उपचार जलद होतात.
4.हे सर्व खोटं आहे, असं काही नसतं असं म्हटलं जातं.
इतर सर्व काही अयशस्वी झाल्यानंतर लोक एनर्जी हीलरकडे येतात. त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणताही इलाज सापडला नाही आणि हा त्यांचा आशेचा शेवटचा बुरुज आहे, काही झालं तरी चांगलं होणार ही विचारसरणी मात्र आपली मुळात हवी. केवळ ग्रहणक्षम (receptive)व्यक्तीच उपचाराचे जलद परिणाम प्राप्त करू शकते.
5. उपचारात रुग्णाचे योगदान
Pranic उपचार अमूल्य आहे. यासंबंधीच्या उपचार पद्धतींवर किंमतीचा टॅग लावता येत नाही. तथापि, उपचार देणाऱयाला त्या उपचार प्रक्रियेला गती देण्यासाठी खर्च करावा लागणारा वेळ तो देतो. उपचार देणाऱयाला प्रशिक्षण घ्यावे लागते, आणि त्याला स्वतःचा व्यायाम आणि ध्यान याबाबतीत शिस्तबद्ध असावे लागते. उपचारकाला त्याची कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.
-आज्ञा कोयंडे








