नवी दिल्ली
आशियाई विकास बँकेने मागच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये भारताला विक्रमी 4.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यातील 1.8 अब्ज डॉलर्सची रक्कम ही कोरोना महामारीशी लढण्यासाठी खर्च करण्यात आली आहे. यात 1.5 अब्ज डॉलर्स कोरोना प्रतिबंधक लसी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले आहेत तर 30 कोटी डॉलर्स शहर क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य सुविधांच्या मजबुतीकरीता खर्चण्यात आल्याचे समजते.









