नवी दिल्ली
2018-20 दरम्यान देशात 17 हजारांहून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी दिली आहे. लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल एनसीआरबी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुर्घटनांमधील मृत्यू तसेच आत्महत्येच्या घटनांची आकडेवारी गोळा करत असल्याचे सांगितले.
वार्षिक स्वरुपात या आकडेवारीला ‘भारतातील दुर्घटनांमध्ये मृत्यू आणि आत्महत्या’ (एडीएसआय) अहवालाच्या स्वरुपात प्रकाशित केले जाते. एडीएसआय अहवालुनसार 2018 मध्ये 5,673 शेतकऱयांनी, 2019 मध्ये 5,957 शेतकऱयांनी आणि 2020 मध्ये 5,579 शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे.









